महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आणखीन एक नवीन पाऊल

महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला बचत गटाचे कार्य जन प्रहारच्या माध्यमातून युद्ध स्तरावर सुरू आहे आणि त्या अंतर्गतच महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. ओमकार दर्शन मधील जन प्रहार शी संलग्नित दुर्गा महिला बचत गटाच्या महिला सदस्यांना स्वयंरोजगाराची सुरुवात करायची होती. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ठरविण्यात आलेल्या मार्गशी्ष महिन्यातील पूजेचे साहित्य विक्री स्टॉल साठी सहकार्य करून आज त्यांच्या या स्टॉल ची सुरुवात करण्यात आली आहे.

विभागातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की महिलां बचत गट अंतर्गत सुरुवात केलेल्या स्टॉल ला आपण अवश्य भेट देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे.
लवकरच आपण महिला बचत गटातील सदस्यांसाठी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत तरी विभागातील सर्व महिलांना आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने बचत गटामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा.



